विदेशी महिलेची साखळदंडातून सुटका


| सिंधुदुर्ग | वार्ताहर |

सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

ललिता कायी कुमार एस. असे या महिलेचे नाव आहे. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंध्याला लॉक करण्यात आले होते. तीन दिवस उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. सोनुर्लीतील काही गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना या महिलेचा आवाज आला. त्यानंतर त्या गुराख्यांनी पोलिसांना माहिती दिली. सदर घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन महिलेची साखळदंडातून सुटका केली. पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.  मात्र ही महिला रोणापालपर्यंत कशी आली, याबाबत पोलीस माहिती गोळा करत आहे. या महिलेची प्रकृती अद्याप सुधारली नसल्याने तिचा जबाब नोंदवण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version