कटकदौंड,पोळ यांच्या दोन पुस्तकांचे विमोचन

मान्यवरांची उपस्थिती
खोपोली | वार्ताहर |
कोकण मराठी साहित्य परिषदेचे खोपोली शाखेचे कोषाध्यक्ष डॉ.सुभाष कटकदौंड यांचे ‘फुले म्हणाली’ आणि जयश्री पोळ यांच्या ‘पदार्थांच्या साथीला उखाणे आले भेटीला’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ब्राम्हण सभासभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, प्रा. एल.बी.पाटील,ज्येष्ठ गजलकार ए.के.शेख, उज्वला दिघे, अनिल रानडे, सुधाकर चव्हाण ,उल्हासराव देशमुख,शाम कांबळे,नगरसेवक किशोर पानसरे,नगरसेविका माधवी रिठे, माजी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार,लेखक रविंद्र घोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.सुभाष कटकदौंड यांनी केले तर आभार रविंद्र घोडके यांनी मानले.

Exit mobile version