पावसाच्या आगमनाने शेतक-यांना दिलासा

शेतीच्या कामात बळीराजा मग्न
| पाताळगंगा | वार्ताहर |
पावसाचे आगमन होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, मागील दहा दिवसांपासून पावसाने चांगलाच दिलासा दिल्यामुळे शेतामध्ये खूप पाणी जमा झाले आहे. यामुळे बळीराजा शेतीच्या कामात मग्न झाल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. वेळेवर पाऊस आला असता तर राब तयार होऊन भातलागवडीस प्रारंभ झाला असता. मात्र, एका आठ्यावड्यात आत भातलागवडीस प्रारंभ होईल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पावसाचे आगमन होत नसल्यामुळे भातशेती जणू कोरडी पडत होती. शेतातील तयार होत असलेले राब करपून जाण्याच्या स्थितीत असताना वरुणराजाने शेतकर्‍यांस चांगलाच दिलासा दिला आहे. दिवसभरातून पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा शेतीच्या मशागतीकडे वळले आहे. शेतामध्ये चिखल करणे, तण उपटणे आदी कामाने जोर धरलेला पाहावयास मिळत आहे.

सध्या शेतामध्ये खूप पाणी जमा झाले असून, भातलागवड पुरेसे पाणी जमा झाले आहे.कारण, पाणी नसेल तर भातलागवड पूर्ण होणार नाही. यामुळे पावसाच्या सरी सातत्याने पडत राहूदे, यामुळे बळीराजा शेतीच्या लागवडीस खंभीर पणे उभा राहील, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version