| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नुकताच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 जाहीर केला. यावर्षीचा अर्थसंकल्प रियल इस्टेट क्षेत्रासाठी उत्तम असल्याचे विश्लेषण रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकार करीत आहेत. याआधी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये चढ-उतारांचा वाटा होता. घरे अधिक किफायतशीर बनवण्यासाठी आणि परवडणारी घरे च्या दृष्टीकोनाला बळ देण्यासाठी, अर्थसंकल्पाने ते सुलभ करण्यासाठी योजना आणल्या आहेत.
या अर्थसंकल्पाबाबत बोलताना अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स सीएमडी अशोक छाजेर म्हणाले की, परवडणार्या घरांना चालना देण्यासाठी सरकार परवडणार्या घरांसाठी पीएमवायए योजना निधीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पीएम आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढून 79,000 कोटी रुपये करण्यात आला आहे. यामुळे 25 लाखांपेक्षा कमी घरांसाठी मोठ्या परवडणार्या गृहनिर्माण विकासकांना चालना मिळेल.