| नागाव | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था नागाव-आक्षी यांची धार्मिक सहल 13 ऑगस्ट रोजी श्रीवर्धन येथील दिवेआगर व हरीहरेश्वर येथे गेली होती. या सहलीत 58 वर्षांपासून ते 82 वर्षापर्यंतचे एकूण 24 ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी सहलीचा आनंद मनमुराद घेतला. या सहलीचे नियोजन संघाचे अध्यक्ष अनंत जोशी आणि सचिव दिलीप वाळंज यांनी केले होते. ही एक दिवसाची सहल आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या सहलीत सहभागी झालेल्या सर्व सभासदांची नाष्टा व जेवणाची सोय रमाकांत वर्तक व दिलीप वाळंज यांनी केली. शेवटी सहलीत सहभागी झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आणि ज्यांनी या सहलीसाठी मदत केली त्या सर्वांचे सावंत यांनी आभार व्यक्त केले.







