पीएनपीच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर व स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या सहयोगाने आयोजित मुंबई विभागीय किक बॉक्सिंग शालेय क्रीडा स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी होली चाईल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वजनी गटात घवघवीत यश संपादन केले. त्यातील 48 किलो वजनी गटात लावण्या कनगुटकर, 48 किलो वजनी गटात मनस्वी मळेकर व 60 किलो वजनी गटात मदिहा मुकादम यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, होली चाईल्ड एसएससी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले व उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय डाकी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version