अलिबागच्या कराटेपटूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

| अलिबाग | वार्ताहार |

नुकत्याच नवी मुंबई येथे कराटे – डू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय केईबुकाई कप कराटे चॅम्पियन 2023 या स्पर्धेत अलिबागचे कराटे प्रशिक्षक क्योशी राहुल तावडे यांच्या सुमारे 22 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेसाठी जपान येथून हांशी साटो व त्यांचा संघ उपस्थित राहिला होता.

या स्पर्धेप्रसंगी अलिबाग येथील विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करून 6 सुवर्ण, 15 रौप्य व 14 कांस्य पदके पटकावून अत्यंत मानाच्या आंतरराष्ट्रीय केईबुकाई कपवर आपले नाव कोरले. यामध्ये कटा व कुमिते प्रकारात रज्जाक मुजावरने दोन सुवर्ण पदके तर साईशा मुंबईकर हिने एक रौप्य व एक सुवर्ण पदक, श्रीयांस तावडे दोन कांस्य पदक, मुमूक्षा घरत दोन रौप्य पदक, तहा गोंडेकर एक रौप्य पदक, हर्ष कालेल एक रौप्य, एक कांस्य पदक, प्रिन्स पाटील दोन कांस्य पदक, सिद्धेश यादव एक रौप्य पदक, सार्थक मोरे एक रौप्य, एक कांस्य पदक, सूर्यवीर चौधरी दोन कांस्य पदक, आदित्य चोरघे दोन रौप्य पदक, मद्यान कडीरी एक रौप्य पदक, आश्मित थळे एक रौप्य, एक कांस्य पदक, नृपाल पाटील दोन रौप्य पदक, प्रिया देशमानेएक सुवर्ण, एक रौप्य पदक, आरोही जगे एक सुवर्ण पदक, मोक्षदा पाटील दोन कांस्य पदक, मिहीर वर्तक एक सुवर्ण, एक कांस्य पदक, इशिता मांडवकर एक कांस्य पदक, कार्तिक गावंड एक कांस्य पदक, तनिष्क तावडे एक रौप्य, वरद देशमाने एक कांस्य पदक पटकाविले.

Exit mobile version