स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगीरी

सत्यजित बडे यांच्याहस्ते बक्षिसांचे वितरण

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात अलिबागच्या अक्षरा थळेने प्रथम क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेच प्राथमिक गटात उरणच्या जयंत देवरे, लघुपट निर्मिती स्पर्धेत रामकृष्ण भोईर यांनी अनुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना मुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्याहस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व रक्कम देऊन गौरविण्यात आले.

केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत प्रभावी प्रचार व प्रसिद्धी जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व लघुपट निर्मिती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. जिल्हास्तरावर या स्पर्धाचे गुणांकन करण्यात आल्यानंतर निकाल घोषित करण्यात आले. लघुपट निर्मीती स्पर्धा वगळता अन्य स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक गटात घेण्यात आल्या होत्या.

याप्रसंगी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शीनी मोरे, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल

निबंध स्पर्धा (प्राथमिक गट) प्रथम क्रमांक अक्षरा थळे (अलिबाग), व्दितीय क्रमांक श्रेया खडे (कर्जत), तृतीय क्रमांक तनिष्का पाटील (म्हसळा) निबंध स्पर्धा (माध्यमिक गट) प्रथम क्रमांक ईश्वरी लखमोड (महाड), व्दितीय क्रमांक सौरभ विघ्ने (पनवेल), तृतीय क्रमांक दिप्ती कदम (कर्जत) चित्रकला स्पर्धा (प्राथमिक गट) प्रथम क्रमांक जयंत देवरे(उरण), व्दितीय क्रमांक आरशी सोलकर (महाड), तृतीय क्रमांक सोहम इंगळे (सुधागड) चित्रकला स्पर्धा (माध्यमिक गट) प्रथम क्रमांक अनिष फटकरे (म्हसळा), व्दितीय क्रमांक प्रतिक पालवे (कर्जत), तृतीय क्रमांक आयुश जाधव (सुधागड) लघुपट निर्मिती स्पर्धा प्रथम क्रमांक रामकृष्ण भोईर, व्दितीय क्रमांक किरण धारणे, तृतीय क्रमांक प्रकाश सप्रे.

Exit mobile version