बीसीसीआयच्या नियमाचा खेळाडूंना फटका
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बीसीसीआयच्या नियमानुसार फ्रँचायझी जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंना प्रत्येकी 4 कोटी रूपये देऊन संघात कायम ठेवू शकतात. जर यश दयालने भारतीय संघात पदार्पण केले असते तर, बीसीसीआयच्या नियमानुसार यश दयालला संघात कायम ठेवण्यसाठी आरसीबीला 18 कोटी, 14 कोटी किंवा 11 कोटी मोजावे लागले असते. मागील हंगामातील आयपीएलमध्ये यश दयालसाठी आरसीबीने 5 कोटी रूपये मोजले होते. परंतु नव्या नियमानुसार यशला आता 4 कोटी रूपये द्यावे लागतील. त्यामुळे आरसीबीची आता 1 कोटी रूपयांची बचत होणार आहे.
भारतीय नियामक मंडळाने न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला दिलासा मिळाला आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी भारताची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिके होणार आहे.
या मालिकेसाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारतीय संघात आरसीबीचा गोलंदाज यश दयालला स्थान देण्यात आलेले नाही..बांगलादेशला कसोटी मालिकेतील 17 खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले होते. परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या कसोटी मालिकेसाठी यश दयालची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनकॅप्ड खेळाडू म्हणून आरसीबी संघ यश दयालला कायम ठेवू शकतो.
आयपीएल 2024 च्या हंगामात दयालने 14 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या होत्या. तर उपांत्यपूर्व फेरीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात यश दयालने अंतिम षटकात एमएस धोनीला बाद केले आणि तो सामना आरसीबीने जिंकला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप
राखीव- हर्षित राणा, मयंक यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा.







