| मुंबई | प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.26) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारदेखील उपस्थित होत्या. या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.त्यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधू दंडवते यांच नाव दिलं जाणार आहे. याबाबत आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला. मधू दंडवते यांचं कोकण रेल्वेसाठी योगदान पाहता त्यांच नाव देण्याची अनेक वर्षांची मागणी होती. अखेर आज मंत्रिमंडळ बैठकीसमोर परिवहन विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण
