परवानगीशिवाय गोल्फ कोर्सचे नूतनीकरण

| पनवेल | वार्ताहर |

खारघर गोल्फ कोर्समध्ये सिडकोतर्फे सुरू असलेले नूतनीकरणाच्या कामात आदिवासी पाड्याजवळील एका टेकडीचे खोदकाम सुरू आहे. पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय हे खोदकाम सुरू असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याने पर्यावरणवाद्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

सिडकोने खारघर पांडवकडपाच्या पायथ्याशी 9 होल्सचे गोल्फ कोर्स तयार केले आहे. हे गोल्फ कोर्स आता कमी पडू लागल्यामुळे आता या गोल्फ कोर्समध्ये 14 होल्स तयार करण्याचे काम सिडकोने हाती घेतले आहे. आतील हिरवा गालिचा, होल्स, पाण्याचे तलाव आदी नूतनीकरण केले जाणार आहे. या गोल्फ कोर्ससाठी एका टेकडीचे खोदकाम सिडकोने हाती घेतले आहे. पण यामुळे पायथ्याशी वसलेल्या एका आदिवासी पाड्याला भूस्खलनाचा धोका निर्माण होणार असल्याने पर्यावरणवाद्यांनी वा कामाविरोधात आंदोलन केले होते. परंतु या आंदोलनाला न जुमानता सिडकोने खोदकाम सुरूच ठेवल्याने अखेर नेटकनेक्ट फाऊंडेशनने राज्य पर्यावरण विभागाकडे टेकडीच्या खोदकामाला परवानगी दिली आहे कि नाही, याबाबतची माहिती मागवली होती. त्यानुसार संबंधित विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version