आ.जयंत पाटील यांच्या हस्ते मोरे गावदेवी मंदिराचा जीर्णोद्धार

मुरुड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील मोरे गावच्या ग्रामदेवतेचे मंदिर नव्याने बांधण्यात येणार आहे. हे मंदिर शिवकालीन असल्याने ते खूप जुने झाले होते व ते चक्रीवादळात नादुरुस्त झाले होते. तेव्हा येथील ग्रामस्थांनी आ.जयंत पाटील यांनी भेट घेऊन या मंदिराच्या कामाबद्दल सांगण्यात आले होते.

त्यावेळी ग्रामस्थांच्या एका वाक्यावर आ.जयंत पाटील यांनी फॉरेस्टचा अडथळा दूर केला व तसा विषय विधान परिषदमध्ये विषय मांडला व त्याला मंजुरीही देण्यात आली. शनिवारी या मोरे गावच्या ग्रामदेवतेच्या नव्याने बांधण्यात येणार्‍या मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला आ.जयंत पाटील यांनी हजेरी लावत या मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा आ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप साळवी, मनोज भगत तालुका चिटणीस, सरपंच मनीष नांदगावकर, उपसरपंच महेश पाटील, नम्रता कासार ,विहुर सरपंच सौ निलिशा दिवेकर, माजी सभापती चंद्रकांत कामाने आदी मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version