चिरनेरमध्ये पुराच्या पाण्यात उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती

। चिरनेर । वार्ताहर ।

चिरनेर गावातील माजी सरपंच संतोष चिर्लेकर यांच्या मालती राईस मिल जवळच्या पुलालगतचा अंतर्गत मुख्य रस्ता मंगळवारी 19 जुलै रोजी, कोसळलेल्या पुराच्या पाण्यात, तडा जाऊन, खचून उखडला होता. त्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार्‍या वाहन चालकांना हा मार्ग डोकेदुखी ठरत होता. ही समस्या वाहन चालकांनी चिरनेरचे सचिन घबाडी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सचिन घबाडी यांनी पुढाकार घेत, सामाजिक बांधिलकी जपत, तडा जाऊन, खचलेल्या व उखडलेल्या धोकादायक रस्त्याचे स्वखर्चाने, काँक्रिटीकरण करून, रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात का होईना, त्यांनी दुरुस्ती केली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका सध्या तरी टळला आहे. याकामी त्यांच्या सहकारी मित्रांचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सचिन घबाडी यांच्या कार्याचे चिरनेर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांनी आभार व्यक्त करून, त्यांना धन्यवाद दिले.

Exit mobile version