| पनवेल | वार्ताहर |
खराब झालेले विद्युत मीटर त्वरित बदलून देण्याची शिवसेनेची मागणी कामोठे शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांकडे करण्यात आली. कामोठे शिवसेना शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग प्रमुख सचिन त्रिमुखे , संजय जंगम यांनी संबधीत अधिकारांची भेट घेऊन सिडको अधिकारामध्ये असलेल्या कामोठे शहरात कार्यकारी अभियंता सिडको कामोठे या विभागात मीटर साठा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकाना मीटर बाहेरून जास्त किमतीत विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर मीटर कार्यकारी अभियंता सिडको विभाग इथे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिडको विभाग करण्यात आली.






