। खांब-रोहा । वार्ताहर ।
रा.जि. प शाळा पुगाव ता रोहा या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्थांनी स्वतःच्या आकलनशक्तीने बनविलेल्या वैज्ञानिक प्रतिक्रतीने सार्यांचेच लक्ष वेधून घेतल. या निमित्ताने वैज्ञानिक परिपाठ वैज्ञानिक प्रार्थना, वैज्ञानिक गीत, वैज्ञानिक बातम्या, वैज्ञानिक कथा, वैज्ञानिक सुविचार यावर आधारित वैज्ञानिक परिपाठ, भारतीय वैज्ञानिकांची ओळख व त्यांच्या कार्याबद्दल माहितीचे सादरीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर नाट्य सादरीकरण, शालेय विज्ञान प्रदर्शन आदी उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आले. या प्रदर्शनावेळी रोहा तालुका गटविकास अधिकारी सादूराम बांगारे, कोलाड बिटविस्तार अधिकारी व पुगावचे केंद्रप्रमुख रत्नाकर कनोजे, निवास थळे, प्रसाद साळवी व शा.व्य.समिती सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.







