हरभजन सिंगचे प्रत्युत्तर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तानी पत्रकार फरिद खान यांनी ट्वीट केले की एमएस धोनी की मोहम्मद रिझवान? कोण सर्वोत्तम आहे? प्रमाणिकपणे सांगा. या ट्वीटवर हरभजनने उत्तर देताना लिहिले, आजकाल तू काहीपण बोलतोय का? काय मुर्खासारखा प्रश्‍न विचारला आहेस. भावांनो, याला सांगा, धोनी खूप पुढे आहे रिझवानपेक्षा. तू जरी रिझवानला विचारले, तरी तो याचे प्रामाणिकपणे उत्तर देईल. मला रिझवान आवडतो, तो चांगला खेळाडू आहे. पण तुलना चूकीची आहे. आत्ताच्या जागतिक क्रिकेटमध्येही धोनी अव्वल आहे. स्टम्पमागे त्याच्यापेक्षा चांगलं कोणीच नाही.

Exit mobile version