| उरण | प्रतिनिधी |
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर यांनी आपल्या परिसरात 77 वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा केला. समारंभाची सुरुवात प्रमुख पाहुणे गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए यांच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून जेएनपीएचे उपाध्यक्ष रवीश कुमार सिंग, भा. रे. व. से., यांच्या उपस्थितीत मानरक्षक सलामी देऊन करण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि राष्ट्रगीताचे गायन झाले. यानंतर अध्यक्षांनी संचलनाची पाहणी केली.
यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाचा खरा मूलभाव राष्ट्राच्या सेवेसाठी असलेल्या शिस्तबद्ध कर्तव्यभावनेत आहे. देशाचे प्रमुख सागरी प्रवेशद्वार म्हणून जेएनपीए आपल्या कार्यपद्धतीत कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सार्वजनिक सेवेच्या घटनात्मक मूल्यांशी सातत्याने सुसंगत राहून काम करत आहे. जेणेकरून राष्ट्रीय पायाभूत सुविधा भारताच्या प्रगतीचा मजबूत आधारस्तंभ ठरतील.
समारंभाचा एक भाग म्हणून सीआयएसएफकडून डॉग स्क्वॉडचे प्रात्यक्षिक तसेच दहशतवादविरोधी कारवाईचे (काउंटर-टेररिझम) सादरीकरण करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमधून बंदरात कायम ठेवण्यात येणारी सज्जता, सतर्कता आणि सर्वोच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था ठळकपणे अधोरेखित झाली. या सादरीकरणांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यात सुरक्षा दलांची असलेली मोलाची भूमिका बजावली. तसेच, या कार्यक्रमात जेएनपीए शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यासोबतच प्रभावी साहसी (ॲक्रोबॅटिक्स) प्रात्यक्षिक तसेच जेएनपीए फायर टेंडरद्वारे साकारण्यात आले. या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास जेएनपीएचे संचालक मंडळ सदस्य, विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेएनपीएमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
