| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने कर्जत तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होते. विद्यार्थी, चाकरमानी आदी प्रवाशांची खूप गैरसोय होते. या गाड्या थांबाव्यात म्हणून भाजपा किसान सेल कोंकण समन्वयक सुनील गोगटे यांनी केंद्रीय राज्य मंत्र्यांची भेट घेऊन कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा असे साकडे घातले.
कोरोना संकटापूर्वी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत असत मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यातील बहुसंख्य गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. आता सारे काही सुरळीत झाले आहे. मात्र पूर्वी होते ते थांबे अद्याप सुरू झाले नसल्याने तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कर्जतमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आले असता सुनील गोगटे, मारुती जगताप, हरिश्चंद्र मांडे, सर्वेश गोगटे यानी त्यांची भेट घेऊन थांबे पूर्ववत करण्याची विनंती केली.