निराधारांसाठी बचाव मोहीम

| पनवेल | वार्ताहर |

सील आश्रम आणि नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने 15 दिवसांच्या कालावधीसाठी परिसरात बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या स्तुत्य उपक्रमाचे नाव रेस्क्युनाइट 2024 मिशन असे असून त्याद्वारे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यावर भटकणाऱ्या निराधार आणि गरजूंना वैद्यकीय मदत आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात येऊन त्यांना चांगले जीवन प्रदान करण्याचे कार्य करण्यात येणार आहे.

या मिशनचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सील आश्रम, वांगणी-नेरे येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला अल्पसंख्याक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ. अब्राहम मथाई, मिलिंद वाघमारे , सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वपोनि अनिल पाटील, वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सील आश्रमाचे संस्थापक के. एम. फिलिप, मुख्य समन्वयक लाइजी वर्गीस (रेस्क्युनाइट ड्राइव्ह 2024) आदी उपस्थित होते.

Exit mobile version