पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका

| गोंदिया | वृत्तसंस्था |

विदर्भात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून पूर्व विदर्भातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तसेच आज देखील विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच गोंदिया जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकले काही नागरिकांचा सुटकेचा थरार अनुभवायला मिळाला आहे.

गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून. अशातच गोंदिया जिल्ह्यातील पिपरी येथील चुलबंद नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान पिपरी येथील दोघे बापलेक सकाळच्या सुमारास शेतात गेले होते. दरम्यान अचानक पावसाने शेताला वेढा घातला अजून ते दोघेही बापलेक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांनी एका झाडाचा सहारा घेत असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. तर अशीच एक घटना गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी येथे घडली. भंडारा जिल्ह्यात 20 ग्रामीण भागातील जिल्हा अंतर्गत अनेक मार्ग बंद

Exit mobile version