मान अडकलेल्या कुत्र्याची सुटका

। सुधागड /पाली । वार्ताहर ।
पालीमध्ये एका मोकाट कुत्र्याच्या गळ्यामध्ये प्लास्टिक बरणी अडकल्याने तो अतिशय बेजार स्थितीत होता. अनेक दिवस या गळ्यातील प्लास्टिकची बरणी घेऊन तो सर्वत्र फिरत असे, अखेर पालीतील ह्युमन अँड अ‍ॅनमल रेस्क्यू टीम व शिवऋण प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पाली पंचायत समिती कार्यालयाजवळ या कुत्र्याला शिताफीने पकडले आणि त्याच्या गळ्यात अडकलेली प्लास्टिकची बरणी काढून त्याला मोकळे केले. कुत्र्याला पकडण्यासाठी शिवऋण प्रतिष्ठानचे सदस्य अमर लहाने, गंगाधर पांडव यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version