| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सरकारी-निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संतप्त झाले आहेत. सुधागड तालुक्यातील कर्मचारी संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी संघटनांनी शासनाला पुरेसा वेळ दिला असूनही चर्चेची संधी न देणाऱ्या शासनाच्या असंवेदनशील भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचारी संघटनांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं, असे आवाहन देत संपात सहभागी होऊन एकजुटीचे दर्शन घडवण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य गट-3 (चतुर्थश्रेणी) कर्मचारी महासंघ यांचा सहभाग आहे.
शासनाच्या असंवेदनशील भूमिकेवर नाराजी
