| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण पंचायत समितीच्या एकूण आठ गटातील आरक्षण सोडत भूसंपादन उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली आणि उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या उपस्थितीत विशेष सभेत शालेय विद्यार्थी यज्ञेश चौधरी (9) रा. केगाव-उरण याच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली.
यामध्ये नवघर गण- 51 मधील जागेवर (नामप्र सर्वसाधारण), भेंडखळ गण- 52, केगाव गण-55 व चाणजे गण- 56 या तीन जागांसाठी सर्वसाधारण व जासई गण- 53, चिरनेर गण- 57 व आवरे गण- 58 साठी या तीन जागा सर्वसाधारण (स्त्री राखीव) अशा आल्या असून, चिर्ले गण- 54 मध्ये नामप्र (स्त्री राखीव) अशी उरण तालुक्यातील एकूण आठ पंचायत समिती गणातील आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीसाठी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, महसूल नायब तहसीलदार रवींद्र सानप, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार नरेश पेढवी व निवडणूक नायब तहसीलदार प्रभाकर नवाळे यांच्यासह तालुक्यातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरण पंचायत समितीच्या आठ गणांसाठी आरक्षण सोडत
