रायगडातील 810 ग्रामपंचायतींचा समावेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण दोन महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण रद्द करुन नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून, 15 जुलैपर्यंत आरक्षण नव्याने सुनिश्चित करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार नव्याने बुधवारी (दि.15) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे. त्यामुळे अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. एकूणच, नव्याने आरक्षण जाहीर होणार असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी सरपंचांची स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण 2025 ते 2030 या कालावधीकरिता एप्रिल 2025 मध्ये जाहीर करण्यात आले होते. कोणती जागा कुणाला सुटली हे स्पष्ट झाल्याने गावगाड्यातील भावी सरपंच कामाला लागले होते. एवढेच नव्हे, तर अनेकांनी जनसंपर्क वाढविला होता. असे असतानाच शासनाकडून नव्याने आरक्षण निर्णय झाला आहे. नवीन आरक्षणामुळे वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांनी संधी मिळेल आणि त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे या आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत संख्या 810, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 16,महिला 17, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 62,महिला 62, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 109, महिला 110, सर्वसाधारण जागा-खुला 217, महिला 217 या जागांसाठी आरक्षणांचे सोडत होणार आहे.
अलिबाग तालुक्यातील 62 ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 0, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 6, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिला 16 जागा आहेत.
मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 0,महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3, महिला 2, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 3, महिला 4, सर्वसाधारण जागा-खुला 6, महिला 5 जागा आहेत.
पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 7, महिला 7, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 8, महिला 9, सर्वसाधारण जागा-खुला 16, महिला 16 जागा आहेत.
पनवेल तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 2, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5, महिला 6, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 10, सर्वसाधारण जागा-खुला 20, महिला 18 जागा आहेत.
उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2, महिला 1, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिलांसाठी 11 जागा आहेत.
कर्जत तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 8, महिला 8, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 8, महिला 7, सर्वसाधारण जागा-खुला 10, महिलांसाठी 12 जागा आहेत.
खालापूर तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षीत जागा खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5, महिला 5, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिलांसाठी 10 जागा आहेत.
रोहा तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5,महिला 5, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 9, महिला 8, सर्वसाधारण जागा-खुला 17, महिलांसाठी 17 जागा आहेत.
सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 0, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5, महिला 6, नागरीकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 7, महिलांसाठी 5 जागा आहेत.
माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 2, महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3, महिला 4, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 10, महिला 10, सर्वसाधारण जागा-खुला 22, महिलांसाठी 21 जागा आहेत.
तळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2, महिला 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 4, महिला 3, सर्वसाधारण जागा-खुला 5, महिलांसाठी 7 जागा आहेत.
महाड तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 3, महिला 3, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 5, महिला 4, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 18, महिला 18, सर्वसाधारण जागा-खुला 41, महिलांसाठी 42 जागा आहेत.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील 42, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 2, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2, महिला 1, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 5, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 13, महिलांसाठी 12 जागा आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 0, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 3, महिला 3, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 6, सर्वसाधारण जागा-खुला 11, महिलांसाठी 13 जागा आहेत.
म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीमधील, अनुसूचित जाती आरक्षित जागा खुला 1, महिला 1, अनुसूचित जमाती आरक्षित जागा खुला 2, महिला 2, नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षित जागा खुला 6, महिला 5, सर्वसाधारण जागा-खुला 10, महिलांसाठी 12 जागा आहेत.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती, खुला, नागरिकांचा मागासप्रवर्ग, महिला वर्गातील सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. बुधवारी (दि. 15) सकाळी अकरा वाजल्यापासून आरक्षण सोडतीला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कभी खुशी, कभी गम
मागील एप्रिल महिन्यामध्ये सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी अनेकांनी या सोडतीवर आक्षेप घेतला होता. काहींनी आनंद व्यक्त केला होता. परंतु, पुन्हा सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे येत्या 15 जुलैला आरक्षण सोडत तालुकास्तरावर काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये कोणाच्या आशा पल्लावीत होतात, तर कोणाचा हिरमोड होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.