अशोक चव्हाणांचा सरकारवर हल्लाबोल
| मुंबई | वृत्तसंस्था |
मराठा समाजासाठी 10 टक्के आर्थिकदृष्ट्या मागास घटकाचे आरक्षण मान्य नसल्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले. मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने आज प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणासंदर्भात ठळकपणे प्रकाशित केलेल्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चव्हाण यांनी म्हटले की, ही जाहिरात खेदजनक आहे. शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं कराङ्घङ्घ, असे या जाहिरातीत नमूद आहे. याचा अर्थ मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, असे राज्य सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.