मुरूड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

। मुरूड । वार्ताहर ।
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश दि. २२/०७/२०२२ नुसार माहे जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ तसेच माहे में २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुरुड तालुक्यातील मुदत संपणाऱ्या तसेच यापूर्वी दिनांक २९/११/२०१९ रोजी दिलेला प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम चुकीच्या पदधतीने राबविल्यामुळे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मुरुड तालुक्यातील वेळास्ते, काकळघर, कोर्लई, वावडुंगी व तेलवडे या ०५ ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

यापैकी ०४ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडतीची विशेष ग्रामसभा दि.२९/०७/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्यात आली. छाया तबीब, अव्वल कारकून यांनी वावडुंगी, नारायण गोयजी अव्वल कारकून यांनी कोर्लई, खुशाल राठोड, मंडळ अधिकारी मुरुड यांनी काकळघर व संजय तवर, मंडळ अधिकारी नांदगांव यांनी वेळास्ते ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत विशेष ग्रामसभेचे अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सोडती अंती ग्रामपंचायत निहाय आरक्षणाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. वेळास्ते ग्रा.पं अ.क्र. प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक १ मध्ये जागा ३ आरक्षण अनुसूचित जमाती सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वसाधारण स्त्री व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण व स्त्री सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.

काकळघर ग्रा. पं अ.क्र. प्रभाग क्रमांक प्रभागातील जागा प्रभाग क्रमांक १ मध्ये आरक्षण सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्री सर्वसाधारण स्त्री आरक्षण पडले आहे.

कोर्लई ग्रा.पं अ.क्र. प्रभाग क्रमांक प्रभागातील जागा आरक्षण प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमाती व स्त्री सर्वसाधारण व स्त्री सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जमाती व स्त्री सर्वसाधारण व स्त्री सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.

वावडूंगी ग्रा.पं अ.क्र. प्रभाग क्रमांक १ मध्ये जागा आरक्षण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्री सर्वसाधारण व स्त्री सर्वसाधारण प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण स्त्री आरक्षण पडले आहे.

तेलवडे ह्या ग्रामपंचायतीसाठी नागरिकांचा मागसर्वग प्रवर्ग यासाठी जागा देय नसल्याने मा. राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार आरक्षणामध्ये कुठलाही बदल नसल्याने सदर सोडत कार्यक्रम राबविण्यात आला नसुन त्याचा आरक्षणाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. तेलवडे ग्रा.पं अ.क्र. प्रभाग क्रमांक १ मध्ये आरक्षण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती स्त्री व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक अनुसूचित जमाती व सर्वसाधारण स्त्री प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण आरक्षण पडले आहे.

सदर प्रारुप आरक्षण सोडतीवर हरकत असल्यास दि. ०१/०८/२०२२ ते ०३/०८/२०२२ या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय मुरुड जंजिरा येथे लेखी स्वरुपात हरकती दाखल करता येतील. या आरक्षण सोडतीच्या कामकाजामध्ये मा. डॉ. महेंद्र कल्याणकर भा.प्र.से. जिल्हाधिकारी रायगड व प्रशांत ढगे उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली रोहन शिंदे तहसिलदार मुरुड-जंजिरा, निवडणूक नायब तहसिलदार अमित पुरी, निवासी नायब तहसिलदार रविंद्र सानप, महसुल सहाय्यक प्रतिक पावसकर, संगणक परिचालक साहिल वाळंज यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version