। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मजा बैनाडे यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. त्यांच्या जागी संदेश शिर्के यांची निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने शुक्रवारी दुपारी याबाबत आदेश काढले असल्याचे समजते.
पद्मश्री बैनाडे या गेल्या अडीच वर्षांपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अडीच वर्षानंतर त्यांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ येथील उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांची रायगडचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.