मुरुड तालुक्यात खळबळ; विरोधकांची कामे करीत असल्याने नाराजी
। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासमवेत आपापल्या पदाचे राजीनामे दिले असल्याने मुरुड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील पक्षाच्या माध्यमातून होणारी विकासकामे पक्ष कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता डावलून करत असल्याने सर्वांनी तालुका सचिव विजय पैर यांच्याकडे राजीनामे दिले. जिल्हा अध्यक्षांकडे हे राजीनामे सादर करण्यात आले आहेत.
तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्यासह सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मुरुड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले, की मुरुड तालुक्यामधील जिल्हा परिषद व पक्षाच्या निधीतून केली जाणारी विकासकामे यासंदर्भात तालुका अध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता ना विरोधकांची कामे करत असल्याने पक्षावर नाराजी व्यक्त करीत एकमताने सर्व पदाधिकार्यांनी राजीनामे दिले.
पक्षश्रेष्ठी व नेत्यांकडून सातत्याने त्यांना व त्यांनी सुचविलेल्या कामांकडे दुर्लक्षित केले जात असल्याचे तसेच शिष्टाचार मोडून काहींनी गटा-तटांचा राजकारण सुरु केल्याने त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असल्याचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले. दि. 6 एप्रिल रोजी मंगेश दांडेकर यांच्या निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकारिणी समिती व प्रमुख कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली. एकनिष्ठेने राष्ट्रवादी पक्षाचा सेवाभावी काम केल्याचे सर्वांचे एकमत आहे. खा. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाची व त्यांच्या कामांची ओळख तालुक्यातील गावागावा मध्ये होऊन राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता निर्माण व्हावा यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे खासदार, पालकमंत्री व आमदार असूनदेखील पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचत असल्यची सर्वांना खंत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
राष्ट्रवादी पक्षासोबत युती-आघाडीकरिता तालुक्याच्या राजकारणात वेळोवेळी बदल होत असलेल्या धोरणामुळे कार्यकर्ते संभ्रमात राहिले, नक्की कोणाशी साधून घ्यायचं हाच मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात आघाडीचा राजकारण जरी असला तरी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचं कुठेही शिवसेनेशी जुळत नाही, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची अवहेलना व खोटा प्रचार करून नगरपालिकेची सत्ता मिळवणारे काही नेते त्यांच्या कार्याक्रमाची शोभा वाढविण्यासाठी शिष्टाचार डावलून तालुका अध्यक्षांना न सांगता खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती व आ. अनिकेत यांना थेट भेटून आपली कामे करू






