| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
मागील दोन महिन्यांपासून अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेमध्ये आले आहेत. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आले आहेत. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलन सुरु आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ठराव समोर आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.