विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची तत्परता
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या तत्परतेमुळे पनवेल रेल्वे स्थानकामधील भुयारी मार्गावर साचणार्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. पनवेल रेल्वे स्थानकामधील भुयारी मार्गातील पायर्यांजवळ पाणी साचले होते. गेले दोन दिवस थोड्या प्रमाणात पाणी होते, परंतु पाण्याचे प्रमाण वाढले होते आणि त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणाहून पायी चालणे त्रासाचे झाले होते. याबाबत तेथील प्रवाशांनी याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांना दिली.
सदर तक्रारी बाबत त्वरित कार्यवाही करून तेथील अधिकारी राजेश पाटील यांच्याकडून माहिती घेतली असता सदर बेसमेंटमध्ये पाणी उपसा करणारी मोटर नादुरुस्त झाली होती. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी साचले होते हे त्यांनी मान्य केले. येत्या 12 तासात आम्ही सदर मोटर दुरुस्त करून चालू करू असे त्यांनी प्रीतम म्हात्रे सांगितले. त्याप्रमाणे सदर मोटर दुरुस्त करून पाणी उपसा सुरू झाला व त्या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला. याबद्दल विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचे प्रवाशी वर्गाने आभार मानले आहेत.