नारी शक्तीचा आदर करा

। उरण । वार्ताहर ।
शारदीय नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक सण आहे. या सणात आपण महिषासुराचा वध करणार्‍या व दुष्ट शक्तींचा नाश करणार्‍या दुर्गामातेची नऊ दिवस मनोभावे पूजा करतो. अशा या नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून प्रत्येकाने नारी शक्तीचा आदर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नवी मुंबई ग्लोबल फाऊंडेशनच्या अध्यक्षा दर्शना भोईर यांनी व्यक्तकेले.
यावेळी वनिता भोईर, शारदा खारपाटील, सध्या नारंगीकर, अश्‍विनी नारंगीकर, कविता खारपाटील, अनिता नारंगीकर, कुंदा नारंगीकर व महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version