| म्हसळा | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त म्हसळा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश मेहता यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे पूजनकरून अभिवादन करण्यात आले. म्हसळा ग्रामीण रूग्णालयात मागील चार महिने अपुरा कर्मचारी असताना सेवेत कार्यरत असणाऱ्या मोजक्याच अधिकारी व कर्मचारी वर्गाने सर्वच प्रकारच्या रुग्णांना वेळेत आणि चांगली आरोग्य सेवा सुविधा दिली होती. त्यांच्या या कार्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मेहता यांनी डॉ. मोहमद रहाटविलकर, सिध्दकला काते, नलिनी जाधव, प्रदिप काळोखे, रुपेश कांबळे, दिव्या गीजे, दिपेश्री जंगम, रेखा म्हात्रे, कमलेश बेटकर यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.
सोनम सुगदरे, अश्विनी जाधव, आकाश म्हात्रे, श्रीकांत कदम, अश्विनी मेहत्रे, नौसीन परकार यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अस्मिता तांबडे, डॉ. फराह जलाल, डॉ. भावना अर्बन, सायली केलसकर, सागर सानप, वैशाली पाटील, युक्ता तुरे, सागर गाणेकार, विश्वजीत सालावकर, साहिल उबाळे, कमलेश बेटकर आदी मान्यवर अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.