शरद पवार गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन
| खोपोली | प्रतिनिधी |
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गटाच्या शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. महिलांसाठी स्पर्धा तसेच आरोग्या संबंधीचे मार्गदर्शन ठेवले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन माजी नगरसेविका केविना गायकवाड, पत्रकार सारिका सांवत, संतोषी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ.कटकदौड, राष्ट्रवादी अल्पसंख्याक महिला प्रदेश सरचिटणीस जैनुबा शेख, राष्ट्रवादी महिला उपजिल्हाध्यक्षा संगिता पुटेल, खालापूर तालुकाध्यक्षा पुष्पा पालवे, खोपोली शहर संपर्क प्रमुख पोर्णिमा गायकवाड, लक्ष्मी नगर विभाग अध्यक्षा संगिता शिंदे, युवती प्रमुख स्नेहल पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयश्री डोंगरे, वैशाली भोसले, प्रज्ञा महाडिक, प्राजक्ता शिर्के, दिपाली भोसले, सुभद्रा पगारे, भारती भिसे, संचिता भुवर, प्रतिक्षा नाईक यांनी मेहनत घेतली.






