पोलीस भरतीसाठी नवी मुंबईत युवकांचा प्रतिसाद

उद्यापासून सुरु होणार प्रक्रिया; 204 जागांसाठी 12 हजार अर्ज

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलीस विभागात भरती प्रक्रिया सुरु होणार असून 204 पोलीस शिपायांची भरती केली जाणार आहे. यासाठी तब्बल 12 हजार 375 अर्ज आले आहेत. ही भरती प्रकिया 2 ते 13 जानेवारी दरम्यान कळंबोली मुख्यालय मैदानात पार पडणार आहे. या सर्व प्रक्रियेवर कॅमेराची नजर असणार आहे.

अशा होणार परीक्षा
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाची भरती करण्यात येणार आहे. यासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. या 204 पदांच्यासाठी तब्बल 12 हजार 375 अर्ज आले आहेत. यात 10 हजार 434 पुरुष, एक हजार 794 महिला आणि 147 माजी सैनिकांचे अर्ज दाखल झालेले आहेत. ही परीक्षा मैदान चाचणी 50 गुण आणि 100 गुण लेखी परीक्षेला असणार आहेत. मैदानी चाचणी 2 जानेवारी पासून सुरु होणार 13 जानेवारी पर्यंत चालणार आहे. यात गोळा फेक, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे या शिवाय महिलांसाठी गोळा फेक, 100 मीटर आणि 800 मीटर धावणे याचा समावेश आहे.

परीक्षेत पारदर्शकता ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया कॅमेरात कैद करण्यात येणार आहे. पोलीस भरती दरम्यान उमेदवारांना येणार्‍या अडचणी समस्याच निराकरण करण्यातही नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या www.navimumbaipolice.gove.in या संकेत स्थळावर भेट देणे आवश्यक आहे. राज्यातील विविध भागातून येणार्‍या उमेदारांच्यासाठी सोयी सुविधा राहणे जेवण आदी साठी सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवारांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय कक्ष देखील उभारण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक होणार असून सर्व परीक्षा कॅमेरात कैद होणार आहे. त्यामुळे नोकरी लावतो म्हणून कोणी आमिष दाखवत असेल तर बळी पडू नका. असे प्रकार समोर आले तर नियंत्रक कक्ष, लाच लुचपत विभागाशी संपर्क करावा.

संजयकुमार पाटील
प्रशासन उपायुक्त
Exit mobile version