आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराला प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे शिवजयंती उत्सव समिती 2023 आणि माजी आ. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान यांचे माध्यमातून आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मुंबई येथील ज्योवीस आयुर्वेद हॉस्पिटलच्या आरोग्य पथक आणि डॉक्टरांनी रुग्णांची चिकित्सा केली. या चिकित्सा शिबिरात 199 रुग्णांची तपासणी ज्योवीस आयुर्वेद कडून तर त्या सर्व रुग्णांना मोफत औषधे यांचे नारी सामाजिक संघटनेने दिली.

बापूराव धारप सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन डॉ. राज सातपुते यांचे हस्ते करण्यात आले. डॉ ज्योती सातपुते, विजय सातपुते यांच्यासह माजी आ. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे मुकेश सुर्वे, मनीषा सुर्वे,विजय मांडे, संतोष सारंग, प्रीतम गोरी, अविनाश चंचे, सुमित क्षीरसागर, मंगेश मगर, विवेक भिसे, यतीन यादव, बंडू क्षीरसागर, राहुल भाटकर, आल्पेश मनवे, कोस्तूभ गावकर, चिराग गुप्ता, भावेश व्यास,अरविंद कटारिया, कमलेश ठक्कर, किसन खडे,गणेश खराटे, प्रथमेश मोरे, राजू मिर्कुटे आदि उपस्थित होते.

Exit mobile version