| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील परहूर येथे स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्यावतीने परहूर ग्रामपंचायत सभागृहात ‘तुम्ही जगा आणि दुसर्याला जगवा’ या शिकवणीनुसार नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 161 महिला आणि पुरुष भाविकांनी रक्तदान केले. गेल्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी या संस्थानच्या वतीने राज्यभर रक्दान शिबिराचे आयोजन करण्यात येते. दरम्यान, हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व युवा कार्यकर्ते आणि वरिष्ठ मंडळींनी मेहनत घेतली. यावेळी रक्तदान करणार्या दात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.