| माणगाव | प्रतिनिधी |
शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था ता. माणगाव संस्थेच्यावतीने के.ई.एम रुग्णालय परेल मुंबई यांच्या सौजन्याने व विशेष सहकार्याने शिवजयंतीनिमित्त सोमवारी(दि.19) महारक्तदान शिबिराचे आयोजन कुणबी भवन हॉल, निजामपूर रोड, माणगाव याठिकाणी करण्यात आले होते. या महारक्तदान शिबिरात 161 रक्ताच्या बॅग संकलित करण्यात आल्या. संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन अॅड. राजीव साबळे, नगरध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्याहस्ते करण्यात आले.
शिबिराच्या या सेवाभावी उपक्रमास के.ई.एम. रुग्णालयाचे समाज विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावंत, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अॅड.राकेश पाटील, आनंद यादव, संगीता बक्कम, प्रशांत साबळे, शर्मिला सुर्वे, सुविधा खैरे, रश्मी मुंढे, रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, दिलीप जाधव, सुवर्णा जाधव, डॉ. अभिजित मेहता, डॉ. गौतम राऊत, राजेश मेहता, कपिल गायकवाड, दिनेश रातवडकर, अजित तारळेकर, रामनारायण मिश्रा, सुभाष गुगळे, बिपीन दोशी, सिराज परदेशी, लक्ष्मण दळवी, प्रदीप गांधी, प्रदीप नाईक, नामदेव शिंदे , दीपक मोरे, प्रफुल पवार, डी. एम . जाधव आदी मान्यवरांनी भेट देऊन संस्थेला भरभरून शुभेच्छा देत कौतुक केले.
या शिबिरात निलेश मेथा यांनी 101 वा तर संस्थेचे अध्यक्ष सलीम शेख यांनी 50 वा आपला रक्तदानाचा हक्क बजावला. या दोघांना तसेच, सर्व रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या शिबिरात डॉ. केतकी क्षीरसागर, सुवर्णा जाधव, विनया जाधव, यशोधरा गोडबोले यांनी विशेष योगदान दिल्याबद्दल संस्थेतर्फे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा जंगम, विनया जाधव, प्रभाकर मसुरे, स्वप्ना साळुंके यांनी केली.