| रसायनी | वार्ताहर |
अनंत विभुषित जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज प्रणित स्व- स्वरूप संप्रदाय यांच्यावतीने दि. 10 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मोहोपाडा येथील ग्रामपंचायत सभागृहात हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 71 रक्तदात्यांनी आपला रक्तदानाचा हक्क बजावला.
रक्ताची गरज लक्षात घेता संपुर्ण महाराष्ट्रात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मोहोपाडा येथील रक्तदान शिबिरात रक्तदान करणा-यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. साई ब्लड बँक पनवेल यांच्या ब्लड बँकेत सदरचे रक्त संकलित करण्यात आले.