| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जे.एस.एम. महाविद्यालयामध्ये कॅरम लीज ऑफ रायगड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी जिल्हा कॅरम अ.सो.चे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कमळ पतसंस्थेचे चेअरमन सतिश पाटील, सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबागमधील अभिजीत कॅरम क्लबने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत रायगडमधील एकूण 72 खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्यांना बारा मालकांच्या टीममध्ये सहा-सहा च्या स्वरुपात विभागण्यात आलेले आहे. रविवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
चित्रलेखा पाटील आणि गिरीश तुळपुळे यांनी एक डाव खेळत स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल उभयतांनी आयोजकांना, सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.