दिव्यांग तपासणी शिबिरास प्रतिसाद

| पोलादपूर | वार्ताहर |

पोलादपूर तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणासह बॅ. नाथ पै सभागृहामध्ये दिव्यांगांसाठीच्या मोजमाप शिबिराला प्रतिसाद लाभला. याप्रसंगी मोजमाप शिबिराचे अधिकारी साईनाथ पवार यांनी खा. सुनील तटकरे यांनी केंद्रशासनाच्या सामान्य न्याय विभागाच्या माध्यमातून अलिम्को कंपनीने प्रायोजित केल्यावरून या दिव्यांगांच्या मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

डॉ.निहास मेहता, डॉ.संकेत डेरवणकर, डॉ.रामकुमार सिंह, डॉ.अभिषेक द्विवेदी आणि डॉ.मनीष शर्मा आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तालुक्यातील उपस्थित 219 दिव्यांगांपैकी पात्र 82 दिव्यांग व्यक्तींची साहित्य आणि कृत्रिम अवयव देण्यासाठी मोजमाप घेण्यात आले. याप्रसंगी महाड उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे आणि पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, सहायक गटविकास अधिकारी सी.बी.हंबीर तसेच पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.भाग्यरेखा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बावडेकर, तसेच या मोजमाप शिबिराचे समाज कल्याण अधिकारी साईनाथ पवार व वेखंडे, महाड येथील श्रीसमर्थ दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष मुबीन देशमुख व पोलादपूर शाखेचे अध्यक्ष सागर शेलार आणि प्रहार दिव्यांग संधटनेचे महमद मुजावर तसेच दिव्यांग आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठया संख्येने गर्दी लाभली.

Exit mobile version