वेश्वीत नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद

| उरण | वार्ताहर |

ग्रामपंचायत वेश्वी, तालुका उरण येथे जन कल्याण सामाजिक संस्था व लायन्स क्लब पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रा. राजेंद्र मढवी, सुनील तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास सुधाकर पाटील, संतोष पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

या शिबिरात 300 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 64 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्र क्रियेसाठी पात्र ठरले. लायन्स क्लब वतीने श्री. चव्हाण, श्री.गिल्डा, ॲड. मनोज म्हात्रे आणि नायर नेत्र रुग्णालयाची टीम, तसेच राजेंद्र पाटील, मदन पाटील, अच्युत कडू, संदीप मुंबईकर, विजय पाटील, शरद पालकर यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version