आरोग्य शिबिराला प्रतिसाद

। कोर्लई । वार्ताहर ।

जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुरुड तालुक्यातील मजगावमध्ये रविवारी (दि.7) आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील दंत चिकित्सक प्रकाश कळके यांच्या बाजारपेठेतील सुमुख दातांच्या दवाखान्यात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात आलेल्या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी तालुक्यातील नागरिकांची हिमोग्लोबिन, मोतीबिंदू, दंत व नेत्र तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

कोणतेही लोकोपयोगी उपक्रम राबविताना स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. तालुक्यातून, नांदगाव मजगांव पंचक्रोशीतील मिळालेल्या सहकार्यातून आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी झाल्याची भावना डॉ.प्रकाश कळके यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version