आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
अँटिकरप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया मुरुडच्या वतीने मुरुड तालुक्यातील विहूर आदिवासी वाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी 200 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. मयूर कल्याणी, अँटिकरप्शन फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय म्हात्रे, रायगड जिल्हाध्यक्ष कर्णिक, राहुल कासार, डॉ. अमित बेनकर, डॉ. हितेश जैन, डॉ. संजय जैन, डॉ. निशिगंधा माळी, रायगड जिल्हा चिंब इन्चार्ज रुपेश दांडेकर, रायगड जिल्हा सल्लागार अमोल शेडगे, रायगड जिल्हा सहाय्यक संजय शेडगे, आशा वर्कर वनिता बांद्रे, अंगणवाडी सेविका नलिनी बांद्रे, अंगणवाडी सेविका परविन हमदुले, मदतनीस दिपाली भोईर, वंदना दळवी, अंगणवाडी सेविका शीतल नांदगावकर, मनीषा दिवेकर, राजू म्हशीलकर आदींसह आदिवासी महिला, मुले, मुली उपस्थित होत्या.
यावेळी आदिवासी वाडीतील सर्व परिवाराची आरोग्यची यशस्वीपणे तपासणी करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे शिबीर घेता आले नाही. दरम्यान, आज झालेल्या मोफत आरोग्य शिबिराने अनेकांना दिलासा मिळाला, असे राहुल कासार यांनी मत व्यक्त केले. या आरोग्य शिबीरात गरोदर माता तपासणी, बालकांची तपासणी, क्षय रोग, रक्त तपासणी आदींसह तपासणी करण्यात आली.

Exit mobile version