तळा शहरात होम मिनिस्टरला प्रतिसाद

| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील चंडिका रंगमंच येथे होम मिनिस्टर व महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तळा नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमानिमित्त नगरपंचायतीतर्फे सर्व महिलांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे आकर्षण असलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा सर्व महिलांनी मनसोक्त आनंद लुटला. यातील विजेत्या दहा महिलांना पैठणी भेट स्वरूपात देण्यात आली. या कार्यक्रमात मुख्याधिकारी माधुरी मडके,नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,नगरपंचायतीच्या सर्व सभापती सर्वपक्षीय नगरसेविका यांसह शहरातील बहुतांश महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version