एचपीव्ही लसीकरणाला प्रतिसाद

| पेण | प्रतिनिधी |

गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सर विरूध्द प्रतिबंधक लस शिबिरात 10 ते 14 वयोगटातील 1500 मुलींना सर्विकल कॅन्सर प्रतिबंधक लस विनामूल्य देण्यासाठी सोबती संस्थेने तयारी केली होती. परंतु, काही मुलींनी अगोदर लस घेतली असल्यामुळे यावेळी 850 मुलींना म.ना.नेने कन्या विदयालयात लस देण्यात आली. तसेच, या लसीकरणाचा दूसरा डोस हा डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याचे डॉ. सोनाली वनगे यांनी सांगितले आहे.

या प्रतिबंधक लसी बाजारामध्ये खुप महाग असून सर्वसामान्य घरच्या मुलींना देणे हे पालकांना परवडण्यासारखे नाही. तसेच, दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरच्या प्रमाणोचे विचार करून सोबती संघटना व इतर सामाजिक संघटनेच्या अथक प्रयत्नातून मेगा पोजेक्ट एचपीव्ही व्हॅक्सीनेशन कँप हा प्रोजेक्ट राबविण्यात आला. यावेळी ॲड. मंगेश नेने, अतुल म्हात्रे, डॉ.सोनाली वनगे, डॉ. निता कदम, आदित्य जोशी, संजय कडू, महेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version