| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यातल्या दररोज बदलणाऱ्या दलबदलू राजकारणावर अलिबागकरांनी संताप व्यक्त केलाय. मनसेच्या वतीने आयोजित ‘एक सही संतापाची’ या उपक्रमात अलिबाग एसटी बस स्थानकात लावलेल्या स्वाक्षरी फलकांवर शेकडो नागरिकांनी सह्या करून संताप नोंदवला. शिवाय राज्यातल्या दलबदलू पक्षांतर, सत्तांतर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. मनसेचे तालुका अध्यक्ष सिद्धनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला.
या स्वाक्षरी अभियानात अलिबागकरांनी उस्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. तालुका अध्यक्ष सिद्धनाथ म्हात्रे यांच्या सह सचिव विनायक पालेकर, उपाध्यक्ष जितेंद्र भोईर,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष महेश घरत, राज्य परिवहन कामगार सेना तालुका अध्यक्ष अमित कंटक, उपतालुका अध्यक्ष अरुण ठाकूर, सचिन डाकी, शहर अध्यक्ष राजेश थळकर आदी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले होते.
मुरुडमध्ये सह्यांची मोहीम
| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल! आतापर्यंत महाराष्ट्राने सगळ्या प्रकारच्या आघाड्या युत्या बघितल्या त्यात कोण विरोधक आणि कोण सत्तेत तेच जनतेला कळेनासं झालं आहे. या सर्वांचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र भर एक सही संतापाची मोहीम राबाविण्यात येत आहे. (दि.9) जुलै रोजी साळाव चेक पोस्ट येथे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा अध्यक्ष शैलेश दिलीप खोत, राजेश तरे यांच्या उपस्थितीत सह्यांच्या मोहीमेचा कार्यक्रम आयोजित केला. याला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
चिरनेरमध्येही अभियान
| चिरनेर | वार्ताहर |
एक सही संतापाची या उपक्रमांतर्गत मनसेतर्फेउरण शहरात सह्यांची मोहीम दि. 8 व 9 जुलै या दोन दिवसात राबविण्यात आली. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, अल्पेश कडू, रामदास पाटील, राहुल पाटील, कल्पेश कोळी, मनोज कोळी, सुनील कोळी, चिराग कोळी, प्रतीक कोळी, पंकज पाटील, विशाल भोईर, संदीप म्हात्रे, रतिष गायकवाड, प्रज्वल भोईर, रमेश घरत, महेंद्र कोळी, सोमनाथ मढवी, सुदर्शन पाटील, सदानंद पाटील, प्रसाद पाटील, अभिषेक गायकवाड, सनी भोईर, आदेश म्हात्रे, कुशल घरत, आदी सह उलवे शहर पदाधिकारी व मन सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.