| वावोशी | वार्ताहर |
दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका रोहा, जिल्हा रायगड यांच्या वतीने रोहा येथील पडम बुद्ध विहार येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व वर्षावास मालिकेचा भव्य प्रारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम आषाढ पौर्णिमा या पवित्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कोकण विभाग अध्यक्ष एम. डी. कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान धम्माचे महत्व, संघटनात्मक बांधणी, युवा कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि आगामी वर्षावास उपक्रमांवर विस्तृत चर्चा झाली. तसेच नवीन कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन व संघटन सशक्त करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमास लक्ष्मण सताणे, सुरेश जाधव, सुरेश वाटवे, सुभाष इंगळे, दामोदर मोरे, सूर्यकांत कांबळे, अमोल वाटवे, अनिल वाटवे, राजेश शिर्के, आप्पा तुळवे, तुळशीराम तुळवे, रुपेश शिंदे, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.







