मुरुडमध्ये लसीकरणाला प्रतिसाद

| आगरदांडा | प्रतिनिधी |

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला मुरुड शहरातील मुरुड ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ येथील फातिमा कुलसेम बेगम हॉस्पीटल, मराठी शाळा, मुरुड चेकपोस्ट या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली असून महिलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या मोहिमेकरिता डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा तसेच, नगरपरिषद कर्मचारी, नांदगाव येथील नुतन नर्सिंग होमच्या मुली यामध्ये सहभागी झाले आहेत.

Exit mobile version