चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ओलमन गावातील आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था अध्यक्ष व आदिवासी समाज संघटना कर्जतचे सल्लागार दादा पादीर यांच्या वाढदिवसानिमित्ताने व कै. माजी आमदार मनोहर पादीर यांच्या स्मरणार्थ बस चालक-वाहकांसाठी विश्रांती गृह बांधून देण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे. बऱ्याच वर्षांपासून नेरळ ते ओलमन एसटी बस सेवा सुरू आहे. परंतु, वस्तीला येणाऱ्या बसमधील चालक-वाहकांना राहण्याची व्यवस्था नव्हती. पुर्वी बसमधील मागची व पुढची सीट मोठी असायची. त्यामुळे त्यांना त्यावर रात्री निट झोपता येत होते. परंतु, आता बसमधील सीट छोटी असल्याने त्यांना झोपण्यासाठी मोठी गैरसोय होऊ लागली. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी दादा पादीर यांनी नऊ बाय दहाची रूम तयार करून आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट दिली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version