दत्तमंदिराचा जिर्णोद्धार व लोकार्पण सोहळा

। जेएनपीटी । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील दत्तभाविकांचे श्रद्धांस्थान असलेले चिरनेर कातळपाडा परिसरातील श्रीदत्तात्रयांचे देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार तथा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
संकटसमयी भाविकांच्या हाकेला धावणारे ग्रामदैवत म्हणून श्री दत्तात्रेयवर भाविकांची श्रद्धा असून, या श्रीदत्तात्रेय मंदिराचा जीर्णोद्धार चिरनेर कातळपाडा यांच्या श्रमदानातून तथा लोकवर्गणीतून करण्यात आला आहेे.
याप्रसंगी शेकापचे चिटणीस सुरेश पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, समाजसेवक पी.पी. खारपाटील समाजसेवक पी.पी.खारपाटील, उरण पंचायत समितीच्या उपसभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, यशस्वी उद्योजक संजीवकुमार भगत, उद्योजक राजा खारपाटील, सरपंच संतोष चिर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version